*कोंकण एक्सप्रेस*
*हळबे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “जागतिक लोकसंख्या दिन” याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न….*
*दोडामार्ग:-शुभम गवस*
दिनांक ११/०७/२०२५ रोजी लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात अर्थशास्त्र व प्लानिंग फोरम विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. त्या प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना प्रमुख व्याख्याते मा. प्राचार्य डॉ. हेमंत पेडणेकर यांनी आपल्या भाषणात असे सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आपली स्वतःवरची श्रुद्धा, आत्मविश्वास वाढविला पाहिजे तरच यश संपादन करता येते, त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्वतंत्र निर्णय घेतले पाहिजे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रत्येकाने लैंगिकते बाबत जागरूक असले पाहिजे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी असे सांगितले कि, भारत लोकसंख्याच्या बाबतीत नंबर दोनवर आहे तर लोकसंख्या वाढ हि समाजाला मारक आहे, इतर देशात लोकसंख्या मारक नाही कारण ते देश विकशीत आहेत, तसेच लोकसंख्या वाढीमुळे शहराची निर्मिती झाली त्याचा परिणाम खेडी वसाड पडली, हे सर्व सुरळीत चालण्यासाठी लोकसंख्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, लोकसंख्येचे नियोजन केले तर त्यावर उपाय सापडू शकतात. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील आय. क़्यु. ए. सी. चे समन्वयक प्रा. बर्वे डी. वाय. तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. यु. दरेकर यांनी केले तर सूत्र संचालन कु. पंकजा मणेरीकर यांनी केले तर कु. नम्रता कासकर हिने उपस्थितांचे आभार मानले.