*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या एन सी सी विभागाचा दहा दिवसाचा कॅम्प यशस्वी संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत देशभक्ती आणि देशप्रेमाचे शिस्तबद्ध शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनीचा एन सी सी विभाग कठीबद्ध आहे या विभागाचे नेतृत्व श्री अमोल शेळके सर व सौ शर्मिला केळुसकर मॅडम जाणिवपूर्वक करत आहेत . प्रशालेतील एनसीसी विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा कॅम्प नुकताच सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे संपन्न झाला या दहा दिवसामध्ये एनसीसी विभागातून प्रशालेचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते या दहा दिवसात सर्व प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण आणि देशप्रमाचे शिक्षण देवून विद्यार्थ्यांची मने देशप्रेमाने भारावून गेली एकता ‘समता , बंधुप्रेम व देशप्रेम दृढ करणारे शिक्षण या कॅम्पच्या माध्यमातून दिले गेले यावेळी प्रशालेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनीनी नवव्या दिवशी सांस्कृतील उत्सवातही सहभाग नोंदवून कलाविष्कार दाखून नावलौकिक मिळविला .
वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थांना मिळले तसेच प्रशालेच्या एनसीसी विभागाचे प्रमुख श्री अमोल शेळके सर व सौ शर्मिला केळूसकर यांचे मार्गदर्शनही लाभले या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्यूतराव वणवे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले