*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबईचे सनदी लेखापाल यांच्याकडून प्रशालेला एक लाखाची देणगी प्रदान*
*कनेडी ः प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे सनदी लेखापाल सन्मा.श्री. तुकाराम रासम साहेब यांनी पुन्हा एकदा कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, प्रशालेच्या नियोजित स्नेहबंध इमारतीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिलेली आहे.
यापूर्वी सन्मा. तुकाराम रासम साहेब यांनी प्रशालेला प्रोजेक्टर, तसेच १ लाख ६५ हजार रुपयांची सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम प्रदान केलेली आहे. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा.श्री. सतीश सावंत, उपाध्यक्ष सन्मा. श्री.पी.डी.सावंत, सरचिटणीस सन्मा.श्री.शिवाजी सावंत, खजिनदार सन्मा.श्री प्रकाश सावंत, सर्व सन्माननीय पदाधिकारी व संचालक, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर. एच.सावंत खजिनदार सन्मा.श्री.गणपत सावंत सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सन्माननीय श्री. तुकाराम रासम साहेब यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.