विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली प्रशालेत भव्य ग्रंथप्रदर्शनाने गुरुपौर्णिमा साजरी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली प्रशालेत भव्य ग्रंथप्रदर्शनाने गुरुपौर्णिमा साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली प्रशालेत भव्य ग्रंथप्रदर्शनाने गुरुपौर्णिमा साजरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ग्रंथालय विभागामार्फत आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली प्रशालेचे ग्रंथपाल श्री एम . डी पवार सरांच्या संकल्पनेतून ग्रंथालयाच्या वाचन कक्षात विद्यार्थी व शिक्षकांसाठी वाचनिय अशा पुस्तकांचे भव्य ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनात बाल वाङ्‌मय चरित्र वाङ्‌मय तसेच वैचारिक वाङ्‌मय आकर्षक पद्धतीने मांडणी करून ठेवण्यात आले होते प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यासाठी व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदासाठी हे प्रदर्शन दिवसभर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खुले ठेवले होते या प्रदर्शनात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर व पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर यांनीही विद्यार्थ्याबरोबर वाचक म्हणून सहभाग घेतला तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या ग्रंथप्रदर्शनाच लाभ घेतला
ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत याचे महत्व गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्याच्या मनावर वाचन संस्कारांचे बाळकडू देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!