माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा*

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.*

*वार-गुरुवार, दिनांक- १० जुलै २०२५ रोजी प्रशालेत विद्यार्थ्यां मार्फत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, हिंदू पंचांगानुसार आषाढ शुल्क पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौणिमा साजरी केली जाते. पंडित आत्माराम शास्त्री यांनी सांगितल की, धर्म ग्रंथानुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला. महर्षी वेद व्यास यांना महाभारत, पुराण आणि वेदांचे रचियते मानले जातात. त्यांनी मानवजातीला प्रथम वेदांची ओळख करून दिली, त्यामुळे त्यांना प्रथम गुरु मानले जाते. त्यांच्या जन्म दिनानिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला “व्यास पौर्णिमा” असंही म्हणतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे त्यांना सन्मान देऊन कृतज्ञ व्यक्त केले जाते. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः” धर्मग्रंथांमध्ये गुरुंनाही देवाप्रमाणे मानलं गेलं आहे. यामुळे भारतात गुरु पूजेचे महत्व अनन्यसाधारण आहे.*

*या कार्यक्रमाची सुरुवात व्यास मुनींचे प्रतिमा पुजन व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच जेष्ठ शिक्षक प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आले. प्रशालेतील वर्ग प्रतिनिधींनी गुरुजनांचे पूजन केले व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच १५ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या गुरू विषयी मनोगतातून कृतज्ञता, आदर, भावना व्यक्त केल्या, गुरु हे खऱ्या अर्थाने अंधाराकडून प्रकाशाकडे मार्ग दाखणारा एक तेजोमय किरण असतो. गुरु हा नेहमी होकायंत्रच्या भूमिकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. गुरु विषयी असलेली अपार श्रद्धा विद्यार्थ्यांनी मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला.*

*सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एल. हाटले मॅडम, तर उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!