*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती (आत्मा)च्या अध्यक्ष पदी भाजपच्या भुषण बोडस यांची निवड*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार निवडण्यात येणाऱ्या देवगड तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती (आत्मा)चे अध्यक्ष म्हणून भाजपाचे भुषण बोडस, (पडेल) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष बाळ खडपे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रियांका साळस्कर, माजी जि.प सदस्य संजय बोंबडी, भाजपाचे पदाधिकारी अजित राणे, बाळा गावकर,अतुल वेलणकर, कृष्णा धुरी, प्रसाद देवधर,ज्ञानेश्वर खवळे,बापू जुवाटकर,सरपंच विश्वनाथ खानविलकर,श्रीम.वैशाली तोडणकर, श्रीम.रंजना कदम, राजेंद्र वालकर, सुभाष धुरी आदी शेतकरी तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री भुषण बोडस यांनी पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांचे आभार व्यक्त केले