*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे यांना रिक्षा चालकांच्या समस्या बाबत दिले निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. विजयकुमार काळे यांची भेट घेऊन रिक्षा चालकांच्या समस्या बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादा रिक्षा चालक जर मयत झाला असेल तर, त्याच्या वारसाला सक्सेशन सर्टिफिकेट सक्तीचे करण्यात आले आहे. या विरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून ज्यावेळी नवीन रिक्षा पासिंग साठी येथे त्यावेळी त्या रिक्षाचालकाचा वारस नोंद केली जाते. परंतु यापूर्वी (जुन्या )काही रिक्षा पासिंग करण्यात आलेल्या आहेत, अशा रिक्षांवरती वारस नोंद केलेली नाही. अशा परवानाधारक रिक्षांसाठी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. व रिक्षा चालकांनी आपला वारस नोंद करून घ्यावी .वारस नोंद करतेवेळी वारसाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत सोबत जोडावी. असा तोडगा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने काढण्यात आला. तरी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात येत आहे की, लवकरात लवकर आपली वारस नोंद करून घ्यावी.
हा नियम रिक्षा चालकाने विहित नमुन्यातील फॉर्म भरून दिल्यानंतर लागू होईल.
तसेच सिंधुदुर्ग नगरी येथे पासिंग साठी येणाऱ्या रिक्षा यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. असे संघटनेच्या वतीने सुचविण्यात आले.ही सुद्धा मागणी मान्य करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष रवी माने, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पातडे, सावंतवाडी शहराध्यक्ष शैलेश गंवडळकर उपस्थित होते.