*कोंकण एक्सप्रेस*
*नाधवडेत आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची मांदियाळी*
*मंत्री नितेश राणेंनी घेतले विठुरायांचे दर्शन*
*वैभववाडी ः प्रतिनीधी*
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त नाधवडे येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी पहावयास मिळाली. मंदिरात सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी व वारकऱ्यांच्या जीवनातील समाधानाचे दिवस येवो, त्यांना सुख समृद्धी मिळो. असे साकडे नितेश राणे यांनी विठूरायांच्या चरणी घातले. याठिकाणी वारी निमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी निश्चित आम्ही घेऊ, या पार्श्वभूमीवर नाधवडे गावासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे श्री राणे यांनी सांगितले. दिंडी सोहळा पाहून प्रतीपंढरपूर अवतरल्या ची प्रतिक्रिया श्री राणे यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, कणकवली भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर बाबा कोकाटे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवसापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी पंढरपूरची पायीवारी केली होती. सोलापूर वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायीवारी व रिंगण सोहळ्यात नितेश राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अश्वाचे व पालखीचे दर्शन घेतले.
आज आषाढी एकादशीनिमित्त नितेश राणे यांनी मतदारसंघातील नाधवडे येथे विठ्ठल मंदिरात भेट दिली व पांडुरंगाचे दर्शन घेतले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले