महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सादर विनंती आहे की, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. भरत गोगावले हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी अत्यंत खळबळजनक व जबाबदार पदाला मारक ठरणारे वक्तव्य केले आहे.

या भाषणात त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीरपणे सांगितले की — “माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व सध्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहज पोहोचले नाहीत; त्यांनी यासाठी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामाऱ्या केल्या, मर्डर सगळं केलं.”

या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, मंत्री गोगावले हे त्यांच्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे किंवा सूचक स्वरूपात सांगत आहेत की, जर तुम्हाला नारायण राणेंप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल, तर गुन्हेगारी कृत्ये करावी लागतील. हे वक्तव्य समाजात चुकीचा संदेश देणारे असून, गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणारे आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून मा. गोगावले यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत गंभीर, असंवेदनशील आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे, भारतीय न्यायसंहिता कलम ४६ (गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे) आणि कलम ३५१ (धमकी व गैरवर्तन) नुसार मा. ना. भरत गोगावले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच, जर मंत्री भरत गोगावले यांनी स्वत:च आपल्या भाषणात मा. नारायण राणे यांनी ‘मर्डर व इतर गुन्हे केले’ असे जाहीरपणे सांगितले असेल, तर त्यांच्या जवळ त्या गुन्ह्यांची माहिती असणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे या वक्तव्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात यावी व आवश्यकतेनुसार त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.

आपल्याकडे यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!