*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला हायस्कूलच्या सन १९८४-८५मधील दहावी बॅचचे गेटटुगेदर नुकतेच सातेरी मंगल कार्यालयात संपन्न झाले. तब्बल ४० वर्षांनी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिक्षकांनाही आमंत्रित केले होते. उपस्थित मित्रमैत्रिणींनी एकमेकांविषयी जाणून घेतले. शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या पाहुणचाराने आपण भारावून गेलो असून एकमेकांप्रती असलेले प्रेम दुर्मिळ होत असताना असे एकत्र येऊन स्नेहमेळावा आयोजित केला हे पाहून आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याच्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या