*कोंकण एक्सप्रेस*
*गटाराच्या बांधकामामुळे बस वाहतूक बंद*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषद बाजारपेठेतील गटाराचे काम सुरू असल्याने काम होईपर्यंत किमान २ दिवस तरी बाजारपेठमार्गे एसटी बस वाहतूक एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कुडाळ व सावंतवाडीवरून मठमार्गे ये-जा करणा-या एसटी बससे हॉस्पिटल नाका ते कॅम्प व वेंगुर्ला-तुळस मार्गावरील बॅ.नाथ पै रोडवरून सुरू ठेवण्यात आली.
शासनाकडून नगरपरिषदेस शहरातील गटाराच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील लोकमान्य मल्टिपर्पज बँक ते गाडीअड्डा तिठ्यापर्यंत जाणा-या गटाराचे बांधकाम करण्याच्या कामास नगरपरिषदेने १९ मे पासून सुरूवात केली आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे काम पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे. संबंधित काम सुरू असताना वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी बाजारपेठेतून जाणा-या व येणा-या एसटी बसेस तसेच अवजड वाहने बॅ.नाथ पै या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. गटाराच्या खोदाईमुळे संबंधित दुकानात जाऊन खरेदी करण्यात ग्राहकांची गैरसोय होत होती.