*परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*

*परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*

*कोंकण एक्सप्रेस*

*परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*

*१५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या*

*मुंबई दि. १९*

परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात परिवहन विभागातील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या.

बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारसहसचिव राजेंद्र  होळकर आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेऑनलाइन  बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या  विशेषतः महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्याही प्राध्यान्याने सोडवाव्यात. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच यावेळी मागील वर्षी राबविलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!