भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा

भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा

*कोंकण एक्सप्रेस*

*भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात ” स्त्रियांचे कुंकू” टार्गेट केले गेले. त्यामुळे सिंदूर हे अतिशय समर्पक आणि भावनिक नाव या ऑपरेशनला दिले. याची जाणीव समाजात करून देण्यासाठी, ही यात्रा महिला वर्गाने आयोजित केली होती. भारतीय सैन्य दल, देशाचे पंतप्रधान यांच्या प्रति कृत्यज्ञता, अभिमान व्यक्त करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांनी ही यात्रा काढली. रविवारी सायंकाळी येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या यात्रेला सुरुवात झाली. गांधीचौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. शिल्पा मराठे, सौ. प्रज्ञा ढवण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, जि.प.च्या माजी अध्यक्षा समिधा नाईक, सौ. स्मिता दामले, सौ. शर्वानी गावकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, कुडाळ तालुकाध्यक्षा सौ. आरती पाटील, ओरोस मंडल अध्यक्षा सौ. सुप्रिया वालावलकर, कुडाळ शहर अध्यक्षा सौ. मुक्ती परब, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, सौ. प्रज्ञा राणे, सौ. साक्षी सावंत, सौ. स्वप्ना वारंग, सौ. साधना माडये, सौ. मोहिनी मडगावकर, बांदा ग्रा.पं. सदस्या सौ. रूपाली शिरसाट, सौ. रेखा काणेकर, सौ. मोनाली देसाई, सी. चैत्राली पाटील आदींसह महिलावर्ग तसेच बंड्या सावंत व सुनिल बांदेकर आदी उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!