*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री ना नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे रविवारी ( उद्या ) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे आहे.
रविवारी सकाळी ८.३० वा. अधीश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईकडे प्रयाण, सकाळी ९.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ९.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून फ्लाईट क्र. ६ ई-६०५७ ने विमानाने मोपा, गोवाकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून झेंपॲप सोल्यूशन्स प्रा.लि. या कंपनीने रिक्षा प्रवाशांसाठी विकसित केलेल्या ‘‘येतंव’’ या मोबाईल ॲप सुविधेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती स्थळ : एचपीसीएल सभागृह, विद्यामंदिर कॉलेज, कणकवली, सकाळी ११.३० वा. बांधकाम कामगार महासंघ प्रदेश ४ थे त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थिती स्थळ : आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली
दुपारी २.०० वा. तळेरे वाघाचीवाडी धरणाच्या जलाशयातून स्थानिकांसाठी भविष्यातील रोजगार निर्मितीच्या संधीचा पुर्वाभ्यास यां विषयावर आत्मनिर्भर मस्त्योत्पादन कार्यशाळेच्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे ता.कणकवली, दुपारी ३.०० वा. तळेरे येथून ओम गणेश निवासस्थान कणकवली कडे प्रयाण, दुपारी ४.०० वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव, सायं ५.०० वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून बांदा ता.सावंतवाडी कडे प्रयाण, सायं. ६.०० वा. हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतिक गुरूवर्य संभाजीराव भिडे यांचे व्याख्यानास उपस्थिती
स्थळ : आनंदी मंगल कार्यालय, बांदा ता.सावंतवाडी, सायं ७.०० वा. दशकपूर्ती सोहळयानिमित्त आयोजित मालवणी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : रविकमल हॉल, कुडाळ, रात्रौ. युथ फोरम देवगड आयोजित नाट्य महोत्सव २०२५ स्थळ : शेठ म.ग. हायस्कूल, देवगड, रात्रौ ११.०० वा. देवगड येथून मोटारीने ओम गणेश निवासस्थान कणकवली कडे प्रयाण, रात्रौ ११.४५ वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव, असा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.