*कोंकण एक्सप्रेस*
*२००१ सालच्या इयत्ता दहावी विद्यार्थांचा विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत गुरुजना समवेत स्नेहमेळावा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सन २००१ सालच्या दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा चोवीस वर्षांनी आज गुरुजना समवेत संपन्न झाला . जवळ जवळ दोन तपे उलटून गेली आणि मायेच्या ओढीने सर्व माजी विद्यार्थी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एकत्र आले आणि बालपणात हरवून गेले . २००१ सालचे सर्वच विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध प्रांतात आणि सर्व क्षेत्रात मानाच्या स्थानावर कार्यरत आहेत यातील बरेच विद्यार्थी उद्योग व्यवस्थात स्थिरावलेले आहेत मनोगत व्यक्त करतांना शाळेविषयी असणारे प्रेम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातून दाटून येत होते विद्यामंदिरचे सर्व गुरुजन व त्यांचे मार्गदर्शन संस्कार घेऊन मोठे झालेले विद्यार्थी आदर्शाची खानच आहे असे दिसून आले यावेळी माजी शिक्षक श्री तानवडे सर जगदिश कांबळी सर गुरव सर प्रसाद राणे सर शेळके जे जे सर मुख्याध्यापक पी . जे .कांबळे सर सौ श्रद्धा कदम मॅडम कुबल मॅडम सुखी मॅडम वंदना तांबे मॅडम श्रीम कदम आर आर मॅडम व २००१ सालचे दहावीचे सर्व माजी विद्यार्थी व या सर्व विद्यार्थांना एकत्र करण्याचे महत्वाचे काम उद्योजग श्री निलेश ( मुन्ना ) वाळके श्री निलेश राणे यांनी केले तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विकासासाठी मदत करण्याचेही आश्वासन दिले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर श्री शेळके जे जे सर श्री प्रसाद राणे सर यांनी सर्व विद्यार्थांचे आभार मानले . असेच सत्कार्य तुमच्या हातून घडावे व शाळेच्या प्रगतीत हातभार लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली.