*कोंकण एक्सप्रेस*
*आचऱ्याकडे जाणारा पालकमंत्र्यांच्या वरवडे गावचा रस्ता “दोन वर्षे रखडलेला”*
*एकाच घरात जिल्ह्याची सत्ता असून देखील गावच्या रस्त्याची बिकट अवस्था*
*आपल्या गावचा रस्ता करू न शकणारे, जिल्ह्याचा विकास काय करणार-सुशांत नाईक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वरवडे गावातुन आचऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेली 2 वर्षे रखडलेला आहे. वडील खासदार, भाऊ आमदार व आपण पालकमंत्री अशी एकाच घरात संपुर्ण जिल्ह्याची सत्ता असून देखील आपल्या मुळ वरवडे गावच्या रस्त्याची बिकट अवस्था, जिल्ह्याचे तीन प्रतिनिधी एकाच घरात असून देखील गावचा रस्ता गेली 2 वर्षे रखडलेला आहे. ज्या पद्धतीने या रस्त्याचे काम गेली 2 वर्षे रखडत चालले आहे, त्याच पद्धतीने पुढील पाच वर्षे जिल्ह्याचा विकास देखील असाच रखडत राहणार काय. आपल्या गावचा विकास न करू शकणारे पालकमंत्री, जिल्ह्याचा काय विकास करणार असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. अशी टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.
यामध्ये रस्त्याचे काम हे बजेट मधून व पुलाचे काम हे नाबार्ड मधून मंजूर झाले आहे. यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी शिफारस केली होती. तरी देखील हे काम गेली 2 ते 3 वर्षे रखडलेल्या परिस्थितीत आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याकारणाने याचा नाहक त्रास येथील पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर काम चालू असताना पाणी देखील मारत नसल्याने त्या धुळीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.त्याचबरोबर वरवडे गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा हे गेली कित्येक वर्षी त्याच परिस्थितीत आहे. गेली 35 वर्षे राणे कुटूंबीयांकडे सत्ता असून देखील आपल्या गावाचा विकास हे करू शकले नाही. त्याचसोबत आचार बायपास रस्त्याचे काम देखील याच पद्धतीने गेली कित्येक वर्षे रखडलेले आहे, ठेकेदाराला पैसे देऊन देखील ही कामे रखडलेल्या परिस्थितीत आहेत. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. वरवडे गावच्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी पंचक्रोशीतील नागरिकांची व शिवसेनेची मागणी आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास शिवसेना सार्वजनिक बांधकाम विभागास जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.