*कोंकण एक्सप्रेस*
*आरती कामतेकर यांचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने गौरव*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘Celebrate the Girl Child and Enable Her Education’ या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेवीकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमती आरती विनोद कामतेकर, अंगणवाडी सेविका – अंगणवाडी, ग्राम – कोटकामते प्रभाग- मिठबाव, प्रकल्प – देवगड, या सेविकांचा “आदर्श अंगणवाडी सेविका जिल्हास्तरीय पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट सेवा आणि बालक व मातांसाठी राबवलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. समन्या सामंत व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप सवाळकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेवीकांचा प्रोत्साहन म्हणून दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे एक प्रेरणादायी पाऊल आहे. कोटकामते, ग्रामस्थांनी सौ. आरती विनोद कामतेकर यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.