*कोंकण एक्सप्रेस*
*आरवली येथे महाराजस्व अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान हे ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनता, शेतकरी, महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध स्वरूपाची कामे ही जलदगतीने होतात. त्यामुळे नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत राय यांनी केले.
शिरोडा मंडळात श्रीदेव वेतोबा मंदिराच्या अन्नशांती सभागृहात २४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांस नागरिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादांत संपन्न झाले. यावेळी आरवली श्रीदेव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, शिरोडा मंडळ अधिकारी निलेश मयेकर, रेडी तलाठी सुवणी साळुंखे, आरवली तलाठी सतीश गावडे, आरवलीचे माजी सरपंच मयूर आरोलकर, बबन बागकर, आबा टांककर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य समृध्दी कुडव आदी उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांत संजय गांधीची ८ प्रकरणे मंजूर केली, १० नवीन रेशनकार्ड धारकांना वितरीत केली. जातीचे ५ दाखले, अधिवास २ दाखले व १५ उत्पन्न दाखले देण्यात आले. तसेच सातबारा, आठ व फेरफार महसुली कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच महसुल प्रशासन विभागाकडून यावेळी सातबारात जुनी नावे कमी करणे, नवीन नावे चढविणे, जीवन सातबारा फेरफार नोंदी माहिती व ई पीक पाणी व अँग्री स्टॅक शेतकरी माहिती देण्यात आली.