*कोंकण एक्सप्रेस*
*जी.एस.टी. परीक्षेत कृष्णा, रूद्रचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर तर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेतलेल्या जी.टी.एस.परीक्षेत वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
इयत्ता दुसरीमधील कृष्णा चव्हाण हिने जिल्ह्यात प्रथम व राज्यात सातवा तसेच इयत्ता सातवीमधील रूद्र मोबारकर याने जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तेरावा क्रमांक पटकाविला आहे. या दोघांना स्कूलच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.