*कोंकण एक्सप्रेस*
*जीडीपीत हातभार लावणार्या आकेरीतील सीबीसी प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारताच्या जीडीपीमध्ये अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या आणि शेतकर्यांना समृद्ध करणार्या आकेरी तिठा येथील सीबीसी प्रकल्पाचे उदघाटन गुरुवार दि. २४ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता जिल्हाधिकार्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कौशल्य विकास केद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती इ. सि. शेख, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, एमसीएलचे संचालक डॉ. लवेश जाधव, लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदिकर, प्रा. हरिभाऊ भिसे, डॉ. जाॅन फर्नांडिस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुयश सीबीजी सोल्युशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप पटवर्धन, गोवर्धन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. एस. सावंत यांनी केले आहे.