*कोंकण एक्सप्रेस*
*महाराजस्व समाधान शिबिर प्रमाणपत्रांचे वितरण २५ रोजी*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
उपविभागीय अधिकारी महसूल सावंतवाडी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनता शेतकरी महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयाशी संबंधित महसूली विविध प्रमाणपत्रांचे वितरण २५ एप्रिल रोजी सकाळी १० वा. वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.
यावेळी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) हेमंत निकम, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याध्याधिकारी हेमंत किरूळकर, नायब तहसीलदार (महसूल) मनोज मुसळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी विजय पवार यांच्यासह उभादांडा, मठ, अणसूर, परबवाडा आणि मोचेमाड या ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला महसूल मंडळ अधिकारी विनायक कोदे यांनी वेंगुर्ला मंडळमधील सर्व ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवकतर्फे केले आहे.