*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा देवगड मंडळ अध्यक्षपदी राजा भुजबळ यांची निवड*
*देवगड ः प्रशांत वाडेकर
देवगड तालुक्यातील भाजपाच्या मंडळ तालुकाध्यक्षांची निवड रविवारी निवडणूक निरीक्षक संतोष कानडे यांच्या उपस्थितीत पार पडली. देवगड मंडळ अध्यक्षपदी राजा उर्फ सदाशिव भुजबळ यांची निवड करण्यात आली तर पडेल मंडळ अध्यक्षपदी महेश नारकर यांची फेरनिवड करण्यात आली.
देवगड येथे राजा भुजबळ यांची निवड झाल्यानंतर माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंडळ तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटये, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, न. पं. गटनेते शरद ठूकरुल, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, भाजपा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दया पाटील, राजेंद्र वालकर, महेश जंगले, महिला तालुकाध्यक्ष उष:कला केळुस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.