*कोंकण एक्सप्रेस*
*उबाठाच्या पडेल महिला तालुकाप्रमुख सायली घाडी यांचा भाजपात पक्षप्रवेश*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश*
*सायली घाडी यांच्या पक्षप्रवेशाने उबाठा पदाधिकाऱ्यांची झाली नाचक्की*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
उबाठा शिवसेनेच्या पडेल च्या महिला तालुकाप्रमुख सायली घाडी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोड येथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सायली घाडी यांनी मळेवाड गावचे सरपंच पद भूषविले आहे. मोंड येथे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तेथील विविध कार्यकारी सोसायटी च्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी सायली घाडी यांनी प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, संदीप साटम बाळ, खडपे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस उपस्थित होते.
उबाठा हा संपलेला पक्ष असून तो जनतेला न्याय देऊ शकत नाही. आपणावर ओढवलेल्या एका प्रसंगात उबाठा चे सुशांत नाईक यांनी आंदोलन करण्याचे नाटक केले. मात्र मला न्याय देण्याची ताकद उबाठामध्ये नाही. या प्रकरणी ना. नितेश राणे यांनी न्याय दिला. माझ्या गावचा विकास भाजपाच्या माध्यमातून नामदार नितेश राणेच करू शकतात असा मला विश्वास आहे. असे मत सौ. घाडी आणि व्यक्त केले.