*कोंकण एक्सप्रेस*
*वर्षभर बंद असलेली सावंतवाडी देवरुख बस फेरी २५ एप्रिल पासून पूर्ववत सुरू होणार…*
*पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ निर्णय..*
कणकवली गेली वर्षभर बंद असलेली सावंतवाडी देवरुख व देवरुख सावंतवाडी एसटी बस फेरी बंद होती. सदरची बस सेवा पूर्ववत सुरू व्हावी अशी प्रवासी वर्गातून होत होती. दरम्यान प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांना सूचना केली. त्यानुसार श्री. बोरसे यांनी संबंधित बस डेपोला सूचना करून सावंतवाडी देवरुख व देवरुख सावंतवाडी एसटी बस फेरी सुरू करण्याची सूचना दिली. ही बस सेवा २५ एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांनी दिली. माहिती समजताच प्रवासी वर्गातून आभार व्यक्त केले जात आहे.