*कोंकण एक्सप्रेस*
*उपसरपंच पदी वैभववाडी भाजपचे युवा नेते नवलराज विजयसिंह काळे बिनविरोध निवड*
*वैभववाडी प्रतिनिधी*
ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या उपसरपंच पदी वैभववाडी भाजपचे युवा नेते नवलराज विजयसिंह काळे यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच जंगम यांनी आडिच वर्षाऩर उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त होते गुरुवारी उपसरपंच पदांची निवडणूक जाहीर केल्या नंतर या पदासाठी एकमेव काळेचा अर्ज दाखल झाला होतो त्यामुळे काळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली
यावेळी वैभववाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी आर डी जंगले,भाजप चे प्रभारी सडूरे गावचे माजी सरपंच विजय रावराणे, भारतीय जनता पार्टीचे खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, सरपंच दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, प्रियंका पाटील, विलास जंगम, विशाखा काळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, बाबुराव, श्री विजयसिंह काळे, सौ सुरेखा काळे, मंगेश काळे, वंदना जंगले, अथर्व जंगले, अश्विनी पटकारे, आकाराम बोडेकर, ललित रावराणे, केदार रावराणे,दिलीप भाबर, मंगेश उर्फ बंटी राणे, सागर मेजारी,सुनील राऊत, अशोक पाटील, प्रशांत बोडके,सुनील रावराणे अभय राणे, मुकेश सुतार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.