*कोंकण एक्सप्रेस*
*पी ए एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न*
*वैभववाडी ः संजय शेळके*
पी ए एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम वैभववाडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्ष सौ श्रेया धावले सदस्य पाटील मॅडम राजू जाधव नंदू फुले मुख्याध्यापक दिनकर केळकर शिक्षिका मनिषा साठे ,दर्शना सावंत, अहिल्या लांडगे सौ कोकाटे आधी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदय विद्यालय च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील 12 विद्यार्थ्यांपैकी पीएमसी दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेचे माजी 5 विद्यार्थी असून या पाच विद्यार्थीचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच इयत्ता चौथीचे विद्यार्थी यावर्षी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मनीषा साठे यांनी केले तर आभार व प्रस्तावना मुख्याध्यापक दिनकर केळकर यांनी मानले.