कलमठ-सुतारवाडी येथे १९ रोजी विविध कार्यक्रम

कलमठ-सुतारवाडी येथे १९ रोजी विविध कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठ-सुतारवाडी येथे १९ रोजी विविध कार्यक्रम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कलमठ-सुतारवाडी येथील पिंपळपार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार १९ एप्रिल रोजी पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. फनीगेम्स, ६ वा. भजनांचा कार्यक्रम, ७ वा. स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्स, रात्री ९ वा. चिमणी पाखर कुडाळ यांचा नृत्याविष्कार व सुंदरी डान्स शो फेम दीक्षा नाईक हिचा खास नृत्याविष्कार होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपळपार मित्रमंडळाने केले आहे. ……………… आशिये-ठाकूरवाडीत १८ पासून विविध कार्यक्रम
कणकवली : आशिये-ठाकूरवाडी येथील महापुरुष मित्रमंडळाच्यावतीने ठाकूरवाडी येथे १८ ते १९ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शुक्रवार १८ रोजी सायंकाळी ४ वा. महिलांसाठी फनी गेम्स, रात्री ८ वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ९ वा. गुणगौरव समारंभ, ९.३० वा. रेकॉर्ड डान्सचे सादरीकरण होणार आहे. शनिवार १९ रोजी सकाळी ९ वा. नित्यपूजा, १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वा. आरती व तीर्थप्रसाद, १.३० वा. महाप्रसाद, २ वा. रामेश्वर पावणादेवी प्रा. भजन मंडळ, किर्लोस यांचे दिंडी भजन होईल. रात्री १०.३० वा. उषा परब लिखित व दिनेश पाटील दिग्दर्शित ‘सोरगत’ हे नाट्य सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!