*कोकण Express*
*तळेरे – कासार्डे – पियाळी फोंडा रस्ता डांबरीकरण सह पुलबांधणीसाठी तब्बल 5 कोटी 91 लाखांचा निधी प्राप्त*
पं स उपसभापती प्रकाश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डे पियाळी भागातील रस्त्यांसह पुलांच्या कामासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार तब्बल 5 कोटी 91 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. पं स उपसभापती प्रकाश पारकर यांनी पं स सभागृहात ही विकासकामे व्हावीत यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. या विकासकामांची टेंडर ही प्रसिद्ध झाली आहेत. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून उपसभापती प्रकाश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून भरीव निधी दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
तळेरे -कासार्डे पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणासाठी 2 कोटी 92 लाख 54 हजार 585 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कासार्डे गावच्या सीमेवरील नदीवर भोगले पारकरवाडी, ओझरम ब्राम्हणवाडी कासार्डे गडमठ फोंडा रस्त्यावर पुल बांधण्यासाठी 1 कोटी 19 लाख 71 हजार 683 रुपये, तळेरे – कासार्डे पियाळी फोंडा रस्त्यावरील पुलबांधणीसाठी 1 कोटी 77 लाख 88 हजार 474 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तब्बल 5 कोटी 91 लाखांच्या विकासनिधीमुळे स्थानिक नागरिकांची प्रलंबित मागणी मार्गी लागणार आहे.