*तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन*

*तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन*

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या वाडीतील या स्तुत्य उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.

तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जाते. जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी या वाडीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत स्व निधीतून भव्य असे प्रवेशद्वार उभारले आहे. या प्रवेशद्वाराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, माजी सभापती दिलीप तळेकर, प्रसिध्द भजनी बुवा राजू वळंजू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत बोलताना राजू वळंजू म्हणाले की, वाडीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत सढळ हस्ते मदत केली. त्यामुळे ही भव्य दिव्य प्रवेशद्वार उभे राहू शकले. शिवाय, शहीद कै. रविंद्र गंगाराम जगताप यांच्या नावाने हे उभारलेले प्रवेशद्वार असल्याने त्यांना यासारखी दुसरी कोणतीही आदरांजली उचित ठरणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटी बद्दल सर्वच धन्यवाद व्यक्त करतो.

या वाडीतील श्री साई मंदिर, शेवरा देवीचे जागृत देवस्थान आणि निसर्गरम्य धरण यामुळे निसर्गसौंदर्यात भर पडत असून या प्रवेशद्वारामुळे अजून आकर्षण वाटेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!