*कोंकण एक्सप्रेस*
*महिला राष्ट्रवादीतर्फे डॉ.आंबेडकर जयंती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) तर्फे कॅम्प येथील काथ्या कारखान्यात १४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब व प्रविणा खानोलकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, शहराध्यक्ष सुचिता परब, निधी शिरोडकर, साधना शिरोडकर, सुप्रिया हळदणकर, कामत, सौ.कोयंडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. प्रज्ञा परब यांनी डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.