*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड – गावठण येथील गणेश राणे यांचे निधन*
*शिरगांव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी गणेश रमाकांत राणे ( ३४ ) यांचे रविवार दि. १३ एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने गोवा बांबुळी येथे उपचारादरम्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, काका, काकी, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे. त्याच्या आकस्मित निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.