संविधान निर्मात्‍याच्‍या 134 व्‍या जयंती निमित्‍ताने देवगड बौध्‍दजन सेवा संघाचे रक्‍तदान शिबिर

संविधान निर्मात्‍याच्‍या 134 व्‍या जयंती निमित्‍ताने देवगड बौध्‍दजन सेवा संघाचे रक्‍तदान शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*संविधान निर्मात्‍याच्‍या 134 व्‍या जयंती निमित्‍ताने देवगड बौध्‍दजन सेवा संघाचे रक्‍तदान शिबिर*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड तालुका बौध्‍दजन सेवा संघ व महिला सेवा संघाच्‍या संयुक्‍त विदयमाने तळेबाजार येथील बुध्‍द विहारात महा रक्‍तदान शिबिर आयोजीत करण्‍यात आले.
या शिबिराचा प्रारंभ विश्‍व शांतीदूत भगवान गौतम बुध्‍द आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून करण्‍या आले.याप्रसंगी डॉ.गजानन मोतीफळे, त्‍यांचे सर्व सहकारी, प्रा.सुरेश कुर्लीकर, तालुका संघाचे अध्‍यक्ष शामसुंदर जाधव,सरचिटणीस सुनिल जाधव, प्रकाश जाधव, श्रीपत टेंबुलकर, राजू मुंबरकर, राजू साळसकर, नितेश जाधव, दिपक जाधव, जयंवत मिठबांवकर, समिर शिरगावकर, प्रविण मोरे, श्री.आचारेक, श्री. वैभव वारिक, श्री.चांदोसकर, श्री.तेली, श्रीम. मिठबावकर, श्रीम. जाधव, श्रीम.सुरभी पुरळकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव सुनिल जाधव यांनी मान्‍यवरांचे स्‍वागत करून शिबिराविषयी प्रास्‍ताविक केले.या संपूर्ण शिबिराचे व्‍यवस्‍थापनाची धुरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्‍ठान देवगड यांनी सांभळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!