*कोंकण एक्सप्रेस*
*रामनवमीचे औचित्य साधून श्रीम. मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार*
*शिरगांव ः संतोष साळसकर*
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमीचे औचित्य साधून वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल, व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई, या संस्थांच्या विद्यमाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रामनवमी व एकादशी या दोन दिवशी येणाऱ्या भाविकांना संस्थामार्फत मोफत सरबत वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. मोफत सरबत वाटप स्टॉलला आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक,एड. संग्राम देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तात्कालीन मंत्री दिग्विजय खानोलकर यांचे चिरंजीव विश्वविजय, पत्रकार राजेश कोचरेकर व अन्य मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या, यावेळी सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन येतोच गौरव करण्यात आला.
१९९९ पासून गेली २६ वर्षे रामनवमीचे औचित्य साधून हे उपक्रम घेतले जातात. यावर्षी जिल्ह्यातील सहा मान्यवर व भजन मंडळ आणि कबड्डी संघ यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, निवती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी भिमराव गायकवाड, संस्था सचिव संदीप साळस्कर, वालावल गावचे सरपंच राजेश प्रभू यांचे हस्ते, साईनाथ दळवी, माधुरी खराडे, श्रुतिका मोर्ये, योगेश प्रभू, विजय तुळसकर, डॉ. दिपाली काजरेकर, लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल, व लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दत्ता सामंत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देताना, संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांचा शिवसेनेच्या स्थापनेपासून सन २००५ पर्यंतच्या कार्याचा उलगडा केला. लेखणीच्या माध्यमातून प्रशासनावर असणारी त्यांची पकड, याचा हात कोणीही धरु शकणार नाहीत. त्यांच्या या अभ्यासपूर्वक ज्ञानाचा फायदा पक्षास व्हावा याकरीता आम्ही त्यांचा पक्षात योग्य सन्मान करणार आहोत. गावाने त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून घेतल्यास गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. गायकवाड यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देताना भविष्यातही आपण अशीच प्रगती करावी याकरता प्रोत्साहित केलं. संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी गेल्या २५ वर्षात संस्था मार्फत केलेल्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. सरपंच राजेश प्रभू यांनीही संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचा येथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेमार्फत शारदा विद्यालय डीगस येथील बाल कलाकारांचा मधु कैठभ हा दशावतार प्रयोग करण्यात आला. प्रेक्षकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता बालकलाकार विजय तुळसकर यांच्या विविध प्रकारे हार्मोनियम वाजविण्याच्या कलेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संदीप साळसकर यांनी केले तर सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले