*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण हायस्कूल येथे शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या कार्यकारणी व महिला आघाडीचा*
*स्नेहबंध – २०२५ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*
*कासार्डे ः संजय भोसले*
शिक्षक भारती संघटना जिल्हा सिंधुदुर्गच्या तालुका कार्यकारणी कणकवली व महिला आघाडी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहबंध -२०२५ या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथे करण्यात आले होते.
शिक्षक भारती संघटनेचे राज्य प्रमुख कार्यवाह श्री संजय वेतुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संजय सानप, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रवीण लोकरे विशेष उपस्थित होते.तसेच शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर सर,राज्य प्रतिनिधी श्री.चंद्रकांत चव्हाण सर, कार्याध्यक्ष श्री.प्रदीप सावंत,सचिव श्री समीर परब,संघटक आकाश पारकर,उपाध्यक्ष श्री सुनील जाधव, श्री जे.जे.शेळके,सौ विद्या शिरसाट, तसेच शिक्षक भारतीचे सर्व सन्माननीय जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कणकवली तालुका महिला आघाडीची कार्यकारिणी राज्य प्रमुख कार्यवाह श्री संजय वेतुरेकर यांनी यावेळी जाहीर केली.तालुका महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ. विद्या शिरसाट विद्या मंदिर हायस्कूल कणकवली यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षक भारती सिंधुदुर्ग तर्फे *कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार* प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाद्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर
संचालक विजय देसाई,संदेश धुमाळे यांनी केला. तसेच खारेपाटण ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री संजय सानप यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महादेव मोटे सर यांनी केले व आभार श्री.जनार्दन शेळके सर यांनी केले. त्यानंतर स्नेहबंध – २०२५ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व शिक्षक कलाकारांनी आपली कला उत्स्फूर्तपणे सादर केली. दुपारचे स्नेहभोजन व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कणकवली महिला आघाडी ,खारेपाटण हायस्कूल व शिक्षक भारतीचे सर्व शिलेदार यांनी उत्कृष्टपणे सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला.