*कोंकण एक्सप्रेस*
*देवगडमध्ये नारायण राणेंचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या २५ कि. मी. सायकल स्पर्धेत संदेश भुजबळ तर ११ कि. मी. स्पर्धेत रुद्र चांदोसकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भाजपच्या वतीने देवगड ग्रामीण रुग्णालयासाठी कपाट भेट देण्यात आले तसेच दिविजा वृद्धाश्रम येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सायकल या स्पर्धेत द्वितीय क्रमांक माधव साटम तर तृतिय क्रमांक जशिथ साटम यांनी मिळविला. तर ११ कि. मी. मध्ये द्वितीय क्रमांक शुभम राऊत, तृतीय क्रमांक ममता राऊत यांनी मिळविला. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपाचे जेष्ट नेते बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, भाजपा न. पं. गटनेते शरद टूकरुल, माजी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका अॅड. प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, सौ. प्रियांका साळसकर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोसकर, नगरसेवक व्ही. सी. खडपकर, महिला संघटक उष:कला केळुस्कर, मिलिंद माने, रवींद्र कोयंडे आदी उपस्थित होते.