*अन् डॉ. के. एन. बोरफळकर देवगडचे ‘देव’ झाले!*

*अन् डॉ. के. एन. बोरफळकर देवगडचे ‘देव’ झाले!*

*कोंकण एक्सप्रेस*

*अन् डॉ. के. एन. बोरफळकर देवगडचे ‘देव’ झाले!*

*गेली ५० वर्षे दिली देवगडवासीयांना अविरत वैद्यकीय सेवा*

*अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगडकरांनी केला नागरी सत्कार*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

डॉ. के.एन्. बोरफळकर आपले व्यावसायिक यांनी जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केले. देवगडसारख्या ग्रामीण भागात त्यांचे सरीता हॉस्पिटल हे अत्याधुनिक वैद्यकीय सेवासुविधांनी परिपूर्ण केले, ते केवळ त्यांचा कठोर मेहनतीमुळेच शक्य झाले. रुग्णसेवेचे हे व्रत त्यांनी असेच अखंडीत सुरू ठेवावे, असे प्रतिपादन सायन हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ. अनंत गोरे यांनी केले.
गेली ५० वर्षे देवगडवासीयांच्या सेवेत अविरत कार्यरत असणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. के. एन्. बोरफळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा प्रदीर्घ कार्याप्रती व व्रतस्थ जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरी सत्कार समितीच्यावतीने देवगड हायस्कूलचा पटांगणात मंगळवारी सायंकाळी अमृत सोहळा झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानावरून डॉ. अनंत गोरे बोलत होते. सरस्वती अॅपल हॉस्पिटलचे डॉ. अशोक भुपाळी, नागरी सत्कार समिती अध्यक्ष डॉ. प्रमोद आपटे, माजी आ. अॅड. अजित गोगटे, भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, अॅड. अविनाश माणगांवकर, डॉ. रमेश जाजू, किशोर कुळकर्णी, व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, डॉ. सुहास देशपांडे, डॉ. राम पाटील, डॉ. अशोक अहंकारी, डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, तालुकाध्यक्ष डॉ. सतिश लिंगायत आदी उपस्थित होते.


डॉ. बोरफळकर यांचा देवगड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध मंडळे, विविध संस्था, तालुका व जिल्हा डॉक्टर संघटना यांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. अनंत गोरे यांनी मनोगतामध्ये डॉ. बोरफळकर यांच्या रुग्णसेवेबद्दल कौतुकोद्‌गार काढले. रुग्णसेवेसाठी ज्या गोष्टींची कमतरता भासत होती त्यांनी त्या गोष्टी जिद्दीने पुर्णत्वास नेल्या. वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानातील सर्व गोष्टी ते स्वतः शिकले व त्या ज्ञानाचे भांडार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनाही देवून त्यांना विकसित केले. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्‌गार यावेळी काढले. डॉ. अशोक भुपाळी यांनीही डॉ. बोरफळकर यांचे कार्य वैदयकीय क्षेत्रातील नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी असल्याचे सांगितले. – माधव भांडारी, अॅड. अजित गोगटे यांनीही डॉ. बोरफळकर यांचा कार्याचा गौरव केला. डॉ. जाजू, प्रसाद पारकर, डॉ. पाताडे, डॉ. लिंगायत, डॉ. प्रमोद आपटे, डॉ. नम्रता बोरकर, वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रमोद नलावडे, डॉ. देशपांडे, सोहम कुळकर्णी, सुनिता बोरफळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. अविनाश माणगावकर यांनी तर सुत्रसंचालन मिलींद कुबल व अॅड. अन्वी कुळकर्णी यांनी केले. दत्तात्रय जोशी यांनी आभार मानले.
माझ्या यशाचे मानकरी पत्नी व समस्त देवगडकर

या सत्कारास उत्तर देताना डॉ. बोरफळकर यांनी आपल्या यशात मोठा वाटा आपल्या पत्नीचा असून मला घडविण्यात देवगडकरांचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले. लोकांनी आपले प्राण माझा हातात दिले. पहिली शस्त्रक्रिया एका वॉर्डबॉयकडून शिकलो. तरूणांनी जे शिकायला मिळेल ते शिकून घेतले पाहिजे, असे सांगून समस्त देवगडकरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!