*कोंकण एक्सप्रेस*
*पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन …*
*दोडामार्ग/१०/४/२०२५ -शुभम गवस*
दोडामार्ग पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले दीपक गुंडू सुतार रहाणारे झंरेबांबर, यांचे आज गुरुवारी सकाळी ९ वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक निधनाने दोडामार्ग पोलिस ठाण्यात तसेच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक सुतार हे १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंत्र जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात आपली सेवा बजावली आहे. त्यांचा स्वभाव सर्वांशी मनमिळाऊ व मोठा मित्रपरिवार असल्याने अनेकांना शोक अनावर झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.