*कोंकण एक्सप्रेस*
*आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
डॉ.आंबेडकर जयंती उत्सव, वेंगुर्ला तालुका व शहर समिती, सिधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ महाराष्ट्र मुंबई-शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ-आनंदवाडी आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ-आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती वेंगुर्ला-आनंदवाडी येथे साजरी केली जाणार आहे.
यानिमित्त दि.११ रोजी सकाळी १० वा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती, सकाळी ११ ते २ पर्यंत शहरी आरोग्य केंद्राच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर, दि.१२ रोजी दु.३ वा. चित्रकला स्पर्धा, सायं.६ वा. बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा, मुलांच्या विविध स्पर्धा, दि.१३ रोजी सायं.४ वा. महिलांच्या विविध स्पर्धा व फनी गेम, दि.१४ रोजी स.९.३० वा. पंचशील ध्वजारोहण व भिमवंदना, स.१० वा. मुलांचे भाषणे, ११.३० वा.आनंदवाडी, बाजारपेठ, पिराचा दर्गा ते आनंदवाडीपर्यंत मोटर सायकल रॅली, दु.१२ वा. अॅड.नविना राऊळ यांचे महिलांसाठी मार्गदर्शन, दु.३ वा. जाहीर अभिवादन सभा होणार असून याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा महाराष्ट्र समाजगौरव पुरस्कार प्राप्त प्रा.नितीन बांबार्डेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर जाधव, बौद्ध हितवर्धक संघाचे अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहानी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. सायं.५.३० वा. आनंदवाडी, शिरोडा नाका, बाजारपेठ कॅम्प मार्गे आनंदवाडीपर्यंत सामाजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक तसेच आमदार दिपक केसरकर पुरस्कृत भव्य चित्ररथ स्पर्धा होणार आहे.