*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले येथे मेडिकल कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांना तरुणांच्या जमावाकडून मारहाण : गुन्हा दाखल*
*वेंगुर्ले प्रतिनिधी : प्रथमेश गुरव*
वेंगुर्ले शहरात काल रात्री मेडिकल कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांना तरुणांच्या जमावाने जबर मारहाण केली. ते तरुण सोलापूर येथील असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय राठोड अधिक तपास करत आहेत.
कॉलेजमधील किरकोळ वादाचे पर्यावरण रात्री मारहाणी मध्ये झाले. मारहाणीत तीन पैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कॉलेजच्या या विद्यार्थ्यांच्या मारहाणीमागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. गणेश सुग्रीव जायभाय मूळ राहणार बीड आणि सद्या राहणार वेंगुर्ले यांने वेंगुर्ले पोलीस ठाणे तक्रार दिली आहे.या घटनेमुळे शांत वेंगुर्त्यात एकाच खळबळ उडाली आहे.