*कोंकण एक्सप्रेस*
*केकेव्हीअन्स फाउंडेशन तर्फे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर*
*मालवण ः प्रतिनिधी*
श्रीदेवी केळबाई वार्षिक उत्सवाचे औचित्य साधून केके व्हीअन्स वसुंधरा फाउंडेशन कोल्हापूर( माजी कृषी पदवीधारक) व समस्त मयेकर बंधू मंडळ मुंबई यांनी संयुक्तपणे समता फाउंडेशन मुंबईच्या मदतीने श्री देवी केळबाई मंगल कार्यालय वायरी मालवण या ठिकाणी 5 एप्रिल 2025 रोजी मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला गरजूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. 100 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घेतला. एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉक्टर संजय जोशी यांनी नेत्र तपासणी करून योग्य सल्ला दिला. तसेच ज्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहेत त्यांना समता फाउंडेशन तर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी फाउंडेशनचे श्री अमित वालावलकर प्रा. महेश परुळेकर, समता फाउंडेशनचे श्री सुहास लाटकर, मयेकर बंधू मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री बळवंत मयेकर, सेक्रेटरी श्री चंद्रकांत मयेकर व खजिनदार श्री प्रमोद मयेकर उपस्थित होते. शिबिराच्या समारोपानंतर श्री अमित वालावलकर यांनी सर्वांचे आभार मानले.