*कोंकण एक्सप्रेस*
*एस् टी एस् परिक्षेत इशिता पालकर सिल्व्हर मेडलची मानकरी…!*
*इशिता हि चिंदर पालकरवाडी शाळेची विद्यार्थिनी*
*शिरगांव ः संतोष साळसकर*
सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर पालकरवाडी शाळेची विद्यार्थिनी कु. इशिता शिशीर पालकर हिने १३२ गुण प्राप्त करत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या परिक्षेत मिहिर चिंदरकर, मिधिलेश लब्दे, भूमी आचरेकर आदी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक उज्ज्वला पवार, भाग्यश्री फाटक, केंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा कमिटी अध्यक्ष शिशीर पालकर, सरपंच सौ. नम्रता(स्वरा) महंकाळ-पालकर यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.