*कोंकण एक्सप्रेस*
*संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुभाष कांबळे यांची नियुक्ती*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके *
संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुभाष कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भिमाचा किल्ला या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही निवड घोषित करण्यात आली.
सुभाष कांबळे हे वेंगसर गावचे सुपुत्र असून त्यांनी वेंगसर गावचे सरपंच म्हणून काम केले आहे. तसेच वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेली चार पाच वर्षे ते संविधान सैनिक संघटनेचे संस्थापक डॉ. रवींद्र जाधव यांच्या समवेत काम करीत आहेत. संविधान सैनिक संघ या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दाखल घेत. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपावली आहे.