*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड न. पं. च्या पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची माहिती द्या अन्यथा आंदोलन*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेच्या सध्या सुरु असलेल्या कामाची माहिती मिळावी.या कामच्या ठेकेदाराला केलेला ९५ लाख दंड न. पं. ने वसूल केला का? निकृष्ट बांधकाम तोडून नवीन बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यात आली आले का? खंडेवाल समितीचा अहवालात ताशेरे असतानाही त्या ठेकेदारावर कारवाई का नाही? असा सवाल उबाठा शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र जोगल यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांना केला आहे. आठ दिवसांत माहिती न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, महिला तालुकाध्यक्ष हर्षा ठाकूर, नगरसेवक नितीन बांदेकर, दिनेश पारकर, सौ. रेश्मा सावंत, बाळा कणेरकर आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देवगड जामसंडे नगरपंचायत मार्फत ज्यांना घर नाही अशा लोकांना पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली होती. या योजनेमध्ये सुरू केलेले बांधकाम काम गेली सुमारे तीन चार वर्ष बंद होते. त्याबाबत चौकशी केली असता असे समजले कि या बांधकामाची पहाणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सन २०२२ मध्ये खंडेलवाल समिती आली होती. या समितीने पहाणी करून आपला पहाणी अहवाल नगरपंचायतकडे पाठविलेला आहे. हे केलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असुन हे बांधकाम पाडून नविन बांधकाम करण्याची नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात यावा. तसेच संबंधित ठेकेदाराला (जुन्या) रु. ९५ लाख दंड ठोठावला असून इतर अनेक ताशेरे मारल्याचे समजते असे असतानाही संबंधित ठेकेदाराने सदरचे बांधकाम चालू केले आहे. याबाबत आपण मुख्याधिकारी म्हणून काय कारवाई केली ते बांधकाम पाडणार आहात कि नाही?
नगरपंचायत मार्फत देवगड जामसंडे शहरातील नागरिकांकडून ओला व सुका कचरा घंटागाडी मार्फत संकलन केला जातो, त्याचा कर नगरपंचायत घेत आहे. परंतु १ मार्च. ते ६ मार्च पर्यंत कचरा संकलन बंद होते त्यामुळे नागरीकांची गैरसोय झाली याला जबाबदार कोण?
देवगड जामसंडे नगरपंचायत साठी शिरगाव पाडाघर व दहिबांव अत्रपूर्णा नदीवरुन पाणी पुरवठा केला जातो मात्र प्रत्यक्षात पाडाघर येथून पाणी येतच नाही असं आमच म्हणणं आहे. तसेच अन्नपूर्णा नदीवरुन येणारी पाईप लाईन जीर्ण झाली असल्याने अनेक वेळा फुटत असते. साहजिकच ती दुरुस्त होइपर्यंत पाणी पुरवठा खंडित होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतला यांची माहिती देण्यात यावी. हि विनंती वरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे आम्हाला चार आठ दिवसांत न मिळाल्यास देवगड जामसंडे शहरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिलं यांची कृपया नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.