*कोंकण एक्सप्रेस*
*एनआययुएस या राष्ट्रीय अभ्यास शिबिरासाठी देवगड कॉलेजच्या अलिना खान हिची निवड*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल ग्रॅज्युएट फिजिक्स एक्झामिनेशन (NGPE) मध्ये अलिना गनी खान हिची राज्यपातळीवर टॉप १% विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली तर सानिका निलेश उपरकर ही सेंटर टॉप १०% मध्ये निवडली गेली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती.
भारतभरातून ३६८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये देवगड महाविद्यालयातील फिजिक्स विभागाचे १७ परीक्षार्थी होते. या विद्यार्थिनींना सेंटर टॉपर आणि स्टेट टॉपर यशाबद्दल ‘इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स’ IAPT कडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नॅशनल इनिशिएटीव फॉर अंडरग्रॅड सायन्स (NIUS) या राष्ट्रीय अभ्यास शिबिरासाठी अलिना खान हिची निवड झाली आहे. भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभले. त्यांचे यश शिक्षण विकास मंडळ, देवगडसाठी अभिमानास्पद असून सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अलिना व सानिका यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.