*कोंकण एक्सप्रेस*
*कलशारोहणाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवस्थानच्या कलशारोहण सोहळ्याचा १२वा वर्धापनदिन शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी अभिषेक व इतर धार्मिक विधी, महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ३.३० वा. महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ६ वा. ग्रामस्थांची भजने व रात्रौ ७.३० वा. आजगांवकर दशावतार कंपनीचा ‘चर्तुभूज गणेश‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव ब्राह्मण सेवा मंडळ नमसवाडी व ग्रामस्थ यांनी केले आहे.