एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी परेश धर्णे

एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी परेश धर्णे

*कोंकण एक्सप्रेस*

*एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी परेश धर्णे*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना वेंगुर्ला आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ मार्च रोजी साई मंगल कार्यालय येथे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सन २०२५-२०२६साठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी परेश धर्णे तर सचिवपदी दामोदर प्रभूखानोलकर यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-पिटर डिसोजा व सिमाली मठकर, सहसचिव-सचिन नाईक व भिकाजी निर्गुण, खजिनदार-महेश रेडकर, सहखजिनदार-तानाजी पाटील, कार्याध्यक्ष-प्रशांत आईर, संघटक सचिव-संदिप गोंधळी, सल्लागार विठोबा गावडे, विजय पाटील, विजय चव्हाण, सोहेल बेग, प्रसिद्धी सचिव-प्रकाश नार्वेकर, विभागीय सदस्य-विठ्ठल जाधव, सुनिल कोरगांवकर, रमेश राऊळ, सदस्य – साई तुळसकर, संतोष धुरी, लक्ष्मण कोळेकर, महेश केरकर, प्रदिप काकतकर, भरत सुकळवाडकर, रोहित दाभोलकर, महिला प्रमुख-तृप्ती कांबळी, प्रविणा चव्हाण यांचा समावेश आहे.

या निवडीनंतर विविध विषयांवर चर्चा झाली. कामगारांचे प्रश्न निश्चितपणे सोडविले जातील असे आश्वासन नुतन अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थितांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!