देवगडमध्ये ५० वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. के. एन. बोरफळकर यांचा ८ एप्रिलला नागरी सत्कार

देवगडमध्ये ५० वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. के. एन. बोरफळकर यांचा ८ एप्रिलला नागरी सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगडमध्ये ५० वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. के. एन. बोरफळकर यांचा ८ एप्रिलला नागरी सत्कार*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड तालुकावासियांच्या ५० वर्षांपासून वैद्यकीय सेवेत अविरत कार्यरत असलेले डॉ. के. एन.बोरफळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ कार्यप्रती व व्रतस्थ जीवनप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वा शेठ म. ग. हायस्कूल पटांगण, देवगड येथे अमृत सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती देवगड येथील अॅड. अविनाश माणगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवगड शेठ म. ग. हायस्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी डॉ के एन बोरफळकर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद आपटे, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, किशोर कुलकर्णी, दत्तात्रय जोशी आदी उपस्थित होते. अॅड. माणगावकर पुढे म्हणाले, हा कार्यक्रम सायन हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ. अनंत गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सरस्वती आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉ. अशोक भूपाळी यांच्या शुभहस्ते सत्कार केला जाणार आहे. तरी आपण नागरिकांनी सत्कारास उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. के. एन. बोरफळकर नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!