*देवगड-जामसंडे न. पं. चा वर्धापन दिन सोहळा उत्साहात*

*देवगड-जामसंडे न. पं. चा वर्धापन दिन सोहळा उत्साहात*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड-जामसंडे न. पं. चा वर्धापन दिन सोहळा उत्साहात*

*नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा वर्धापन दिन सोहळा नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू यांच्याहस्ते करण्यात आले. गाणी, नृत्य, नाटिका आणि एकपात्री प्रयोग अशा कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत आणली.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, बांधकाम सभापती शरद टूकरुल, पाणी पुरवठा सभापती अॅड. सौ. प्रणाली माने, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. आद्या गुमास्ते, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरसेविका सौ. मनीषा जामसंडेकर, सौ. ऋचाली पाटकर, सौ. तन्वी चांदोसकर, सौ. स्वरा कावले, नगरसेवक विशाल मांजरेकर, बुवा तारी, सुधीर तांबे, व्ही. सी. खडपकर, माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, माजी नगरसेविका सौ. प्राजक्ता घाडी, सौ. श्रुती जाधव, सौ. उष:कला केळुस्कर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अभियंता विवेक खोत यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी महाराष्ट्राची लोकधारा “ वासुदेव आला हो वासुदेव आला..” हे नृत्य सदर केले. कर्मचारी राजदीप कदम यांनी ‘जोगवा’या मराठी चित्रपटातील “नदीच्या पल्याड आईचा गोंधळ” या नृत्याने रसिकांची मने जिंकली. या गाण्याला नगरसेवक बुवा तारी यांनी बक्षीस देखील दिले. ‘गोमू तुझ्या संगतीने माझ्या तू येशील..’ या सामुहिक नृत्य नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, सौ. ऋचाली पाटकर, उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, माजी नगरसेविका सौ. प्राजक्ता घाडी, कर्मचारी गुरुप्रसाद अदम, मंदार घाडी, रुपेश मणचेकर, स्वरूप कणेरकर यांनी सहभाग घेतला होता. या नृत्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने वन्स मोअर मिळाला. तसेच माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी या नृत्यासाठी बक्षिसही दिले. अभियंता विवेक खोत, लेखापाल सुजित भुसारे, प्रशासन अधिकारी निलेश बांदिवडेकर, कर्मचारी राजदिप कदम यांनी सामुहिक नृत्य सादर केले. ‘अश्वीनी ये ना..’ हे नगसेविका सौ. तन्वी चांदोस्कर व राजदिप कदम यांनी बहारदार नृत्य सादर केले. विवेक खोत, सुजित भुसारे, निलेश बांदिवडेकर, राजदिप कदम, कुंदन घाडी यांनी ‘आरा…रा…रा..’ हे नृत्य सदर करीत प्रेक्षकांना आपल्या नृत्यावर ठेका धरायला लावला. उत्तम जाधव यांनी ‘कौन है जो सपनो..’ हे गाणं सादर केले. ‘सारा जमाना ..’ मनीष मोंडकर यांच्या या गीताने टाळ्यांचा कडकडाट मिळविला. मुख्य लिपिक शिवप्रसाद गावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरील एकपात्री हृदयस्पर्शी प्रयोग सादर केला. उपनगराध्यक्ष सौ. मिताली सावंत ‘फुलले रे मन माझे…’ हे गीत सादर केले.

कोरोना काळातील आठ्वणी वरील राजदिप कदम व शिवप्रसाद गावकर यांनी विनोदी स्किट सादर केले. कु. स्पर्श राजदिप कदम याने पोवाडा सादर केला. कु. सनित संदिप सावंत याने ‘काठी न घोंगड’ व ‘ओ.. शेठ’ हे नृत्य सादर केले. रुपेश मणचेकर यांनी कलयुगातील बदल हा अभिनय सादरीकरण केला. विवेक खोत, मनिष मोंडकर, सुनिल कदम यांनी गाणी सादर केली. ‘रे दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गीत विवेक खोत, सुजित भुसारे, निलेश बांदिवडेकर, राजदिप कदम, कुंदन घाडी यांनी सदर केलेलं. या गाण्यामध्ये मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी सूर धरले. तसेच ‘आरा…रा…रा..’ या घ्ण्यावर देखील मुख्याधिकारी यांच्यासह भाजप गटनेते व बांधकाम सभापती शरद टूकरूल, माजी नगराध्यक्ष योगेश चान्दोस्कर यांच्यासह अनेक नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी ठेका धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!