*कोंकण एक्सप्रेस*
*एस एम प्रशालेत उपजिल्हा रुग्णालय कणकवली मार्फत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिवस तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस उत्साहात साजरा*
*कणकवली : प्रतिनिधि*
सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना क्षयरोग व कुष्ठरोग या रोगांविषयी माहिती देण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय कणकवली मार्फत प्रशालेत क्षयरोग निर्मूलन पोस्टर स्पर्धा तसेच कुष्ठरोग निर्मूलन यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमांतर्गत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
पोस्टर्स स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक दिशा दिनेश गावकर
द्वितीय क्रमांक पूर्वा संतोष सावंत
तृतीय क्रमांक अनुश्री अभिजीत राणे
तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
प्रथम क्रमांक पूर्वा संतोष सावंत, वैष्णवी मिलिंद म्हसकर,जानवी रावण, स्वरा नाईक
तर द्वितीय क्रमांक गट
मुग्धा साईल, वैदेही प्रधान, स्वरा रेवणकर, पूर्वा सावंत
तृतीय क्रमांक गट
मनस्वी आरोलकर, दीपिका आंगणे,जाही मुंज, अद्वैत मिरजकर
सदर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी श्रीमती किरण रास्ते, श्री.प्रशांत बुचडे,श्री संभाजी नांदगावकर, हे उपस्थित होते
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बोडके सर, उपमुख्याध्यापक प्रधान सर, पर्यवेक्षक कदम सर, ज्येष्ठ शिक्षिका वायंगणकर मॅडम, विज्ञान शिक्षक एस एस पाटील सर श्रीम. एस.एस. तावडे उपस्थित होते. कार्यक्रमास कणकवली शिक्षण संस्था कणकवली पदाधिकारी माननीय सचिव श्री नलावडे साहेब, चेअरमन माननीय डॉ.तायशेटे साहेब,
उपकार्याध्यक्ष काणेकर साहेब
यांनी शुभेच्छा दिल्या तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री केंद्रे सर व श्री नौकुडकर सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.