*कोंकण एक्सप्रेस*
*मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात संपन्न*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त चौकचार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम पार पडले.
चौकचार मांड येथे गुरुवारी मांड उत्सवानिमित्त सकाळपासून दिवसभरात पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी चौकचार पाषाण वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच चौकचार घुमटीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त रात्री सामूहिक गाऱ्हाणे घातल्यावर पारंपारिक घुमट वादन व कलावंतीण नृत्य सादर झाले. त्यास सुधीर गोसावी व प्रफुल्ल गोसावी यांची संगीतसाथ लाभली. तसेच हनुमंत वायंगणकर यांनी शिवगीते सादर केली. त्यानंतर स्थानिक बालकलाकारांचे नृत्याविष्कार तसेच देवगड किंजवडे येथील पावणादेवी ग्रुपच्या महिलांचे समई नृत्य सादर झाले. तर शुक्रवारी रात्री छावा चित्रपट दाखविण्यात आला, त्यास प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तर रविवारी रात्री वाडवळ भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेथर, बाळू तारी, राजा गांवकर, आप्पा मोरजकर, लक्ष्मण प्रभू, विनायक मोरजकर, संतोष पराडकर, अभय कदम, राजू वाघ, भूषण मेतर, राजू मालंडकर, नितेश पेडणेकर, बाळा आढाव, अरुण आढाव, दीपक आढाव, विनायक मेथर, यतीन मेथर, प्रथमेश आढाव, गौरेश आढाव, संजय शेलटकर, सचिन गांवकर, अजित शेलटकर, यश तारी, रोशन सावंत, मंगेश आढाव, सर्वेश पराडकर, ललित वाघ, देवेन वाघ आदी व इतर उपस्थित होते.